*मडीलगे येथे विविध विकास कामांचा शुभारंभ तसेच वैयक्तिक योजनांच्या लाभाचे वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले....*
*मडीलगे, ता.आजरा येथे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते खुल्या व्यायम शाळेचे उद्घाटन तसेच महाराष्ट्र संयुक्त वन विभाग, आजरा व संयुक्त वन व्यवस्थापन कमिटी ग्रामपंचायत मडिलगे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या गॅस सिलेंडर वितरण शुभारंभ व बांधकाम कामगारांना सुरक्षा संच वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला असून अध्यक्षस्थानी उत्तूर विभाग राष्ट्रवादीचे प्रमुख वसंतराव धुरे होते.*
*यावेळी मडिलगे गावचे सरपंच गणपतराव आरळगुंडकर, उपसरपंच छायाताई दोरुगडे, भिकाजी गुरव, दिपकराव देसाई, बापू निऊंगरे, के.व्ही.येसणे, अनिकेत कवळेकर, आनंदराव घाटगे, शिरीषराव देसाई, गणपतराव सांगले, मारुतीराव घोरपडे, विजय वांगणेकर, वन परिक्षेत्र अधिकारी स्मिता ढाके, सुधीर सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते. शिवाजी गुरव यांनी आभार मानले.*