खोतवाडीत दोन जुगार अड्ड्यांवर छापा : 16 जणांना अटक
कोल्हापूर ;कुंभोज लोकसंदेश वार्ताहर;विनोद शिंगे
पोलिस उपअधिक्षक पथकाची कारवाई ; 5 लाख 59 हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिस उपअधिक्षक कार्यालयातील पथकाने खोतवाडी येथे सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली सुरू असलेल्या दोन जुगार अड्ड्यांवर छापा टाकत 16 जणांना अटक केली. या कारवाईत रोख रक्कमेसह 14 मोेबाईल, 11 दुचाकी असा सुमारे 5 लाख 59 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात 21 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पोलिस उपअधिक्षक बाबुराव महामुनी यांच्या पथकाने सोमवार 20 जुन रोजी रात्रीच्या सुमारास पार्वती औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वारासमोर खोतवाडी गावच्या हद्दीत दत्तात्रय आड्याप्पा कोल्हे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये सांस्कृतिक मंडळाच्या नांवाखाली सुरू असलेल्या जुगार अड्यावर छापा टाकला. या कारवाईत सिद्धेश्वर हरिश्चंद्र पोवार , दिपक बाबुराव भगत, शेखर महादेव घाटगे, गजानन लिंगाप्पा लोहार, संजय राजाराम देसाई , महादेव मनोहर बुरसे , अजित सदाशिव बेळीकट्टी , राजु शंकर नागे हे जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्याकडून रोख 5270 रुपये, 7 मोबाईल, 5 दुचाकी असा 2 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शेड मालक दत्तात्रय कोल्हे आणि औरंग मौला शेख या 10 जणांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तर अष्टविनायकनगर येथील गौस मुजावर यांच्या घरावर छापा टाकला असता त्रिमुर्ती कला, क्रिडा, सांस्कृतीक मंडळाच्या नावाखाली जुगार खेळ सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावेळी भाऊसो विठ्ठल सुर्यवंशी , राजु आण्णासो पाटील , किरण रमेश जाधव , बाबासो भाऊसो देसाई , श्रीकांत नामदेव पवार , आण्णासो शंकर हिंगमिरे , संदिपक बाळासाहेब खोत, भारत निवृत्ती जाधव यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत रोख 8 हजार 470 रुपये, 7 मोबाईल, 6 दुचाकी असा साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात इमारतीचे मालक गौस गणी मुजावर, मंडळाचे अध्यक्ष औरंग शेख , मंडळ चालक संतोष चव्हाण यांच्यासह जुगार खेळणारे अशा 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Loksandesh News Media Pvt Ltd. Ltd.mumbai