छत्रपती शाहू महाराज यांची 148 जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने चित्रास पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली
SANGLI
मिरज लोकसंदेश प्रतिनिधी; इरफान बारगीर
रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज यांची 148वी जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा सेक्रेटरी जैलाब शेख यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जैलाब शेख म्हणाले की आज भारत देशाला व राज्याला छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांची अत्यंत गरज आहे छत्रपती शाहू महाराज हे रयतेच्या हिता करीता अनेक चांगले योजना राबवल्या कॉलेज होस्टेल शाळा सुरू केल्या
आरक्षणाचे जनक ही छत्रपती शाहू महाराज आहेत.
छत्रपती शाहू महाराज यांचे फार मोठे योगदान आपल्या सर्व भारतीयांना लाभलेले आहे तरी आजचा तरुणपिढीला यांच्या विचारांची मशाल कायम आपल्या मनामध्ये तेवत ठेवली पाहिजे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सेक्रेटरी जैलाब शेख यावेळी म्हणाले यावेळी शिवराज्य सफाई कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश लाड ज्येष्ठ साहित्यिक दिनकर काकडे साहेब मिरज महापालिकेचे कर्मचारी बाळासाहेब कांबळे,शमशुद्दीन खतिब,शिराज शिकारी व मिर्झा शेख आदी उपस्थित होते
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,सांगली