सांगली - 10/01/2021
राज्यसह जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट पसरत आहे. सांगली जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. अशातच राज्य शासनाने कठोर निर्बंध लावले आहेत. वाढत्या कोरोनावर उपाययोजना व विनिमय करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापारी प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संभाव्य धोका पाहता लॉकडाऊन करू नये असे मत बैठकीत व्यक्त केले.

दुकानामध्ये नियमांचे पालन होत आहे, दुकानात गर्दी झाल्याने कोरोना वाढतो हे कोठेही स्पष्टपणे दिसले नाही. त्यामुळे निर्बंधांखाली व्यापाऱ्यांना प्रशासनाने नाहक त्रास देऊ नये असेही व्यापारी म्हणाले. तसेच आठवडी बाजारामध्ये गर्दी होत असल्याने त्याठिकाणी उपाययोजना कराव्यात, गर्दी टाळण्यासाठी विशिष्ठ अंतरावर विक्रेत्यांना जागा आखून द्यावी असे मत यावेळी मांडण्यात आले.
व्यापारी आणि विक्रेत्यांनी नियमांचे पालन करावे, कोठेही गर्दी करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित चैधारी यांनी केले. या बैठकीस पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी यांच्यासह व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.