सांगलीत विनामास्क फिरणाऱ्यावर महापालिकेकडून कारवाईची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. यामध्ये विनामास्क फिरणाऱ्यावर जोरदार कारवाई सुरू असून मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई सुरू आहे.
सांगलीत कोरोना रुग्णसंख्या वाढत चालल्याने कोरोनाचे नियम पाळण्याबाबत मनपा प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र सांगलीत नागरिक विनामास्क फिरून कोरोना नियम तोडत असल्याची समोर येताच असे नियम तोडणाऱ्यावर महापालिकेकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे.
यामध्ये अनेक वाहन धारक हे विना मास्क आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मनपा उपायुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत ही कारवाई केली जात आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन महापालिकेकडून केले जात आहे.