मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली ने दिला ऊस तोड मजुरांना मायेचा ऊब; 300 ऊस तोड मजुरांना स्वेटर,ब्लॅनकेट, चटईचे वाटप.
सांगलीच्या मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने थंडी सहन करून तात्पुरत्या झोपडपट्टीत राहणाऱ्या जवळपास 300 ऊस तोड मजुरांना स्वेटर, ब्लँकेट, आणि चटईचे वाटप करून गारठणाऱ्या कुटूंबाचे संरक्षण केले.
महाराष्ट मायनारीटी फोरमचे अध्यक्ष झाकीर शिकलगार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रात हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे."जिथं कमी तिथं आम्ही" हे ब्रीद घेऊन जात धर्म पंथ विसरून संपुर्ण मानव जाती साठी धावून जाणारी मदनी चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था आहे.
सामाजिक भावनेतून काम करतांना सामाजिक बांधिलकी कायम केली आहे. ऊसतोड मजुरांच्या बरोबरच बेघर कुटूंबाना स्वेटर ब्लँकेट चटईचे वाटप करून त्याना मायेची ऊब तर दिलीच शिवाय पुन्हा मदतीचे आश्वासन दिलं.कोरोना असो वा महापूर या आपत्तीत मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, मदनी ट्रस्टचे महासचिव सुफीयांन पठाण यांच्या पुढाकाराने आणि नियोजना खाली ऊसतोड मजूराना स्वेटर सह साहित्य वाटप करत आपल्या सामाजिक कामाची प्रचिती आणून दिली.वसंतदादा कारखान्याच्या ऊस तोडणी साठी कारखान्याच्या अहिल्या नगर परिसरात उघड्या मैदानात राहणाऱ्या ऊस टोळ्यांच्या कुटुंबातील लहान मुलांना प्रत्यक्षात स्वेटर घालून त्यांचा आनंद द्विगुणित केला.यावेळी महाराष्ट्र ऊस तोड कामगार संघटनेच्या वतीने या उपक्रमाचे स्वागत करत तुमच्या सारखी मंडळी भारत मातेच्या भूमीत निर्माण व्हावी अस सांगत हा उपक्रम राबविल्या बद्दल धन्यवाद दिले. कडाक्याच्या थंडीत स्वेटर सह साहित्य दिल्याबद्दल ऊस तोड कुटुंबातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे ऍडव्होकेट असिफ अत्तार,इम्रान बेग,मौलाना कलिंम मुल्ला, अझर सय्यद, अफजल मोमीन, असद शेख, जावेद महात, जमिरभाई नोमान सय्यद उपस्थित होते.