मुंबई : एखाद्या गावात जुगार, गुटखा विक्री आदि गैरप्रकार चालत असतील तर ते उजेडात आणून त्या विरोधात प़शासनास दखल घ्यायला भाग पाडणे हेच तर माध्यमाचे काम आहे.. माध्यमं समाजस्वास्थ्यासाठी ही काम करीत असताना काही पोलीस अधिकारयांना मात्र पत्रकारांनी अशा "उठाठेव" करू नयेत असे वाटत असते.. मग यातून ते संबंधीत पत्रकारांना "आत टाकण्याच्या" धमक्या देण्याच्या पातळीवर उतरतात
अमरावतीत सध्या हेच सुरू आहे..
पोलीस अधिकारयांचे हे वर्तन खाकी वर्दीचा दुरूपयोग करणारे आणि पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे.त्यामुळे पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने आम्ही या घटनेचा निषेध करीत आहोत.. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आमची विनंती आहे की, त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून प्रकरणाची चौकशी करावी अशी परिषदेची मागणी आहे.. राज्यातील सर्व पत्रकार जनमाध्यम सोबत आहोत..
- एस एम देशमुख