मिरज तालुक्यातील म्हैसाळ गावचे सुपुत्र सहकार महर्षी स्वर्गीय आबासाहेब शिंदे म्हैसाळकर यांचा पन्नासावा स्मृतिदिनानिमित्त आज म्हैसाळ व मिरज येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महापालिक चे स्थायी समिती सभापती श्री निरंजन आवटी, व पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री दिलीप पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कसबे डिग्रज जवळील स्मृति स्तंभास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी आमदार श्री दिनकर तात्या पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आबासाहेब शिंदे यांचे कार्य हे अत्यंत उल्लेखनीय असे होते. सहकार क्षेत्रातील अनेक संस्था उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता त्यामध्ये वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना, भारत सूत गिरणी, यशवंत सहकारी बँक, भूविकास बँक, कृष्णा खोरे दूध संघ गणपती खरेदी विक्री संघ व अनेक उपसा जलसिंचन योजनांची निर्मिती करून सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागाला सुजलाम सुफलाम करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
त्यांच्या अकाली निधनामुळे त्यावेळी मिरज तालुक्याचे नेतृत्व संपुष्टात आले आणि सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली. नटसम्राट स्वर्गीय दिलीप कुमार यांचे बरोबर त्यांचा अत्यंत जवळचा स्नेह होता. सांगली जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत असणारे स्वर्गीय बाबासाहेब शिंदे हे अभ्यासू आणि दूरदृष्टीचे नेते होते.
आज या कार्यक्रमांसाठी भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर, म्हैसाळ चे माजी सरपंच आबासाहेब शिंदे, पंचायत समिती सदस्य बंडू पाटील, डॉ. भालचंद्र साठये, ओंकार शुक्ल, मानसिंग शिंदे, श्रीमती वैशाली पाटील, ॲड. अजिंक्य कुलकर्णी, शहानवाज सौदागर, गजेंद्र कल्लोळी, बाबासाहेब हेरवाडे, बाबासाहेब आळतेकर संजय कोटकर शिवलिंग कुंभार श्रीकांत महाजन हे उपस्थित होते.