सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 16 'अ' पोटनिवडणूकित शिवसेनेची उमेदवारी मला देण्यात आली मी पक्षाच्या आदेशाने मी उमेदवारी दाखल केली. काँग्रेस पक्षाचे अधिकृत जागा असताना काँग्रेस पक्षाने शिवसैनिकांना विश्वासात न घेता पक्षाकडून हेटाळणी झाली म्हणून आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला लढत दिली. माझ्या सर्व मित्रांनी कार्यकर्त्यांनी मला साथ दिली. 535 मतदारांचे मी आभार मानतो.
माझी लढाई काँग्रेसचे उमेदवार तौफिक शिकलगार यांच्या विरोधात नसून दोन मंत्री आणि दोन्ही पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष यांच्या विरोधात होती. मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे मी लोकांच्या सेवेत कायम राहीन म्हणून माझा जनसेवा कार्यालय अहोरात्र खुले राहील. 18 वर्षांपासून सातत्याने समाज कार्यात अग्रेसर असून माझ्या पराभवास कोणालाही जबाबदार धरत नाही, महेंद्र चंडाळे स्वतः जबाबदार आहे माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधात होती.
निवडणुकीमध्ये पैशाची उधळपट्टी झाली प्रशासनाने मतदार यादीत अनेक घोळ झाले तसेच नावे गायब होणे असे प्रकार घडले, अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागल. तरी मी लोकांच्या सेवेत राहून पक्षवाढीसाठी सामान्य रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहीन अशी भूमिका महेंद्र चंडाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.