सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्र.16 मध्ये शिवसेनेला एकदा संधी द्या मुंबई महापालिकेच्या धर्तीवर प्रभाग 16 चा विकास करून दाखवू असा भरोसा जिल्हाध्यक्ष संजय विभूतेयांनी प्रभाग 16 मधील मतदारांना व्यक्त केला.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग 16 चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार महेंद्र चंडाळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ हिरभाग गणपती मंदिरातून करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचा उमेदवार विजयी व्हावा असे साकडे शिवसैनिकांनी गणरायाला घातले. याप्रसंगी बोलताना संजय विभूते यांनी प्रभागातून शिवसेनेला भरघोस पाठींबा मिळत आहे. प्रभाग 16 चा मुंबई महापालिकेच्या धर्तीवर विकास करण्यासाठी महेंद्र चांडाळे यांना विजयी करा असे आवाहन केले. तर अनेक वर्षे एकाच कुटुंबात विकासाचा रथ अडकला असून त्यास बाहेर काढून प्रभागाला मोकळा श्वास घेण्यासाठी शिवसेनेला विजयी करा असे आवाहन शिवसेना नेते दिगंबर जाधव यांनी केले आहे. यावेळी राज्याध्यक्ष चंदनदादा चव्हाण, जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, शहराध्यक्ष मयूर घोडके, युवा आद्यक्ष सचिन कांबळे, नानासाहेब शिंदे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.