संगमनेर ते अकोला तालुका म्हणजे कांदा या पिकाच आगार. यावर्षी अवकाळी पाऊस आणि दूषित वातावरण यामुळे कांदा लागवड उशिरा सुरू झाल्या.
परिणामी अजूनही जानेवारी महिन्यातही कांदा लागवडी सुरूच आहेत. एकदम सर्वच लागवडी बरोबर आल्यामुळे शेतकऱ्यांना तुटवडा जाणवला. या भागात बागायती भागात पाण्यातील कांदा लागवड व पठार भागात कोरड्या तील म्हणजेच गईची कांदा लागवड केली जाते.
कायम गायब होणारी वीज, निसर्गाचा अनियमितपणा, अवकाळी पाऊस, दुखी नैसर्गिक संकटांची शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. एवढे सारे होऊनही पिक हातातोंडाशी आल्यावर कायमच पडणारी बाजार भाव यावेळी तरी शेतकऱ्यांना साथ देणार का हाई एक प्रश्न आहे.