कोरोनाची युरोपमध्ये पुन्हा एंट्री, ऑस्ट्रियामध्ये २० दिवसांचे लॉकडाउन
रोपमध्ये पुन्हा एका कोरोना संसर्ग वाढताना दिसत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता ऑस्ट्रिया सरकारने देशभरात २० दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. नागरिकांनी आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन ऑस्ट्रिया सरकारने केला आहे.
ऑस्ट्रियामध्ये लॉकडाउन काळात रेस्टॉरंटसह दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.तसेच मोठ्या कार्यक्रमांचे आयोजनही रद्द करण्यात आले आहे. पुढील १० दिवसांनंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. यानंतर निर्णय घेतला जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Covid-19 in Europe : जर्मनीमध्ये लसीकरण सक्तीचे
युरोपमधील काही देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोकेवर काढले आहे. यामुळे आता जर्मनीमध्ये कोरोना प्रतिबंधक लसी घेणे सक्तीचे केले आहे. जर्मनीमध्ये कोरोनाची चौथी लाट असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. ऑस्ट्रियामध्ये १३ डिसेंबरपर्यंत लॉकडाउन असेल. मात्र यानंतर कोरोना प्रतिबंधन लस घेतलेले नाही, अशा लोकांवरील प्रतिबंध कायम ठेवण्याचा सरकारचा विचार असल्याचे सूत्रांनी सांगितले.